आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर प्लेटवरून समजते वाहनाची संपूर्ण कुंडली, जाणून घ्या, सांकेतिक कोडचा अर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दुचाकी असो अथवा चारचाकी प्रत्येक वाहनाला RTOद्वारा एक क्रमांक द‍िला जातो. बहुतेकांना आपल्या गाडीच्या इंजिन ते इन्शुरन्सपर्यंत सगळ्या गोष्टींबाबत माहिती असते. परंतु वाहनाला दिल्या जाणार्‍या नंबर प्लेटवरील सांकेतिक कोडबाबत काहीच माहिती नसते.

वाहनाच्या दर्शनी तसेच मागील बाजूस एक नंबर प्लेट बसवलेली असते. नंबर प्लेटवर असलेल्या सांकेतिक क्रमांकात संबंधित वाहनाची संपूर्ण कुंडली लपलेली असते. वाहन कुठल्या राज्यातील आहे तसेच वाहनाचे कोणत्या जिल्ह्यात रजिस्ट्रेशन झाले आहे, याविषयी माहिती लपलेली असते.

प्रत्येक वाहनासाठी नंबर प्लेट ही खूप महत्त्वाची असते. वाहन चोरी गेल्यास या नंबर प्लेटवरूनच त्याचा शोध घेतला जात असतो.

नंबर प्लेटवरील प्रत्येक अंकाला विशिष्ट अर्थ असतो. आम्ही आज आपल्याला वाहनाच्या नंबर प्लेट विषयी माहिती देणार आहोत.
वाहनाच्या नंबर प्लेटचे तीन भागात विभागणी केलेली असते.
1. नंबर प्लेटवरील सुरूवातीची दोन अंक वाहन कोणत्या राज्यातील आहे, हे दर्शवते.
2. नंतरचे दोन डिजिट हे RTOद्वारा मान्यता प्राप्त जिल्ह्याचा सांकेतिक कोड दर्शवतात.
3. नंबर प्लेटवरील पुढील चार डिजिट हा वाहनाचा युनिक नंबर असतो. तो फक्त संबंधित वाहनासाठीच दिलेला असतो.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वाहनावर नसते नंबर प्लेट...