आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायक्रोम इंडियाचे एमडी हरीश जोशी यांचे निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नायक्रोम इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हरीश जोशी (वय 49) यांचे आज (27 सप्‍टेंबर) सकाळी पुण्यात ह्रदयविकाराने निधन झाले. नायक्रोम इंडिया कंपनीला आधुनिक रूप देण्यात त्यांचा महत्वाचा हिस्सा होता. तरुण वयात त्यांचे निधन झाल्याने उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जोशी यांच्या मागे सासरे आणि अध्यक्ष रमेश जोशी, पत्नी मृणाल, कन्या मैथिली आणि मुलगा सोहम असा परिवार आहे. हरीश यांचे अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. ते 1985 सालचे विद्यार्थी होते. अहमदाबादच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी 1986-87 मध्ये व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दुबईतील प्रसिध्द जबेल अलीमधील पॅकेजिंग कंपनीच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी उभारलेली कंपनी पश्चिम आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. त्यानंतर ते नायक्रोम मध्ये रुजू झाले. शारजामधील आजारी पडलेली ल्युब ऑईल क्षेत्रातील एका मेटल ड्रम कंपनीला उर्जितावस्था आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. पॅकेजिंग मशीनरी व्यावसायिक संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. नायक्रोम कंपनीतील तरुणांना बरोबर घेऊन काम करण्यात आणि कंपनीला यशाच्या नव्या शिखरावर नेण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.