आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल कंपन्यांकडूनच इथेनॉलसाठी खोडा, पेट्रोलमध्ये मिश्रण केल्यास लाखो डॉलर्सची बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या आयातीसाठी केंद्र सरकारला लाखो डॉलर्स मोजावे लागत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून लाखो डॉलर्स वाचवण्याचा चांगला पर्याय आहे. मात्र, केवळ तेल आणि केमिकल कंपन्यांच्या हट्टापायी हा पर्याय वापरला जात नसल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.


राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. उसाच्या मळीपासून उत्पादन होणारे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून खर्च कमी करणे शक्य आहे. केंद्र सरकारनेही पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिलेली आहे. त्यासाठी काही तेल कंपन्यांनी इथेनॉल निर्माण करणा-या कंपन्यांकडून निविदाही मागवल्याही होत्या; परंतु त्याची
खरेदी सुरू केलेली नाही.


विरोधाचे कारण काय?
@ भारतातील तेल कंपन्यांचे परदेशातील तेल कंपन्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे या कंपन्या इथेनॉल मिश्रणास तयार नाहीत.तर आपल्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने केमिकल कंपन्याही तेल कंपन्यांना इथेनॉल देण्यास इच्छुक नाहीत.
@ देशात 350 कोटी तर राज्यात 100 लाख लिटर निर्मिती होऊ शकते. राज्यात 31 सहकारी कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारले आहेत. मात्र इथेनॉलची निर्मिती होत नसल्याने दोन हजार कोटींची यंत्रे पडून आहेत.
@ अमेरिका, ब्राझीलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण होते. याबाबत मुख्यमंत्री व आपण पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.