आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाच्या किंमतीत वाढ, मात्र रूपयाचे पुन्हा साठीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कच्चे तेल महागल्याने डॉलर मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाने पुन्हा साठी पार केली. चांगली मागणी आणि जागतिक बाजारातील संकेत यामुळे सोने तसेच चांदी वधारले. सोन्याच्या किमती तोळ्यामागे 90 रुपयांनी वाढून 26,460 झाल्या. चांदीत किलोमागे 635 रुपयांची तेजी येऊन किमत 42,150 झाली. या तेजीमुळे चांदीने 42 हजाराचा टप्पा पार केला. डॉलरच्या तुलनेत होत असलेली रुपयाची घसरण सोने आणि चांदीच्या तेजीस कारणीभूत ठरत असल्याचे मत सराफा व्यापा-यांनी व्यक्त केले.


आंतर बँक विदेशी मुद्रा बँक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 60.39 पर्यंत घसरला. बुधवारी रुपयात 55 पैशांची घसरण झाली. रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया 60.21 या पातळीवर स्थिरावला. जागतिक घडामोडींमुळे रुपयाची घसरण होत असल्याचे मत इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्सचे सीईओ अभिषेक गोयंका यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवर युरोची चाल आणि जगातील प्रमुख शेअर बाजारातील घसरणीचा दबाब रुपयावर दिसत असल्याचे ते म्हणाले.