आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीमुळे रूपयाची पुन्हा घसरगुंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिनाअखेर असल्यामुळे आयातदारांकडून डॉलरला आलेल्या जोरदार मागणीमुळे मंगळवारी रुपया पुन्हा घसरला. डॉलरच्या तुलनेत 15 पैसे गमावत रुपयाने 62.75 ही पातळी गाठली. जागतिक स्तरावर डॉलरचा भाव वधारल्याचा फटका रुपयाला बसला. राजन यांनी गव्हर्नरपद स्वीकारल्यापासून रुपयाच्या मूल्यात चांगली वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने दरात वाढ केल्याने रुपयाची पुन्हा घसरण झाली. गेल्या तीन सत्रांत रुपयाचे मूल्य 98 पैशांनी कमी झाले आहे.


सोने-चांदीत घसरण
सराफा बाजारात मंगळवारी सलग चौथ्या सत्रात घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 25 रुपयांनी घसरून 30,225 झाले. चांदी किलोमागे 85 रुपयांनी स्वस्त होऊन 48,940 वर स्थिरावली. पितृपक्षामुळे सराफा बाजारात सध्या मागणी नसल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले.