आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक कोटी रुपयांची चांदीची मोटारसायकल येणार ग्राहकांच्या भेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने पिवळ्याधम्मक सोन्यात ल्यायलेल्या आणि नाजूक हि-यांनी मढवलेल्या ‘नॅनो’ने सगळ्यांना चकित केले होते. अशा प्रकारच्या शाही नटण्यामध्ये मोटारसायकलीदेखील मागे नाहीत हे दाखवून दिले ते सिल्व्हर प्लस एम्पोरियमने. मुंबईत गुरुवारपासून सुरू होत असलेल्या सिल्व्हर एम्पोरियम इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोमध्ये चांदीत तयार केलेली जगातील पहिली मोटारसायकल सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणार आहे. या मोटरसायकलचे मूल्य 50 लाख रुपये ते एक कोटी रुपये आहे.


अर्थात अगदी नेहमीच्या खरेदीदारांसाठी ही मोटारसायकल नसली तरी मोटारप्रेमी, विविध प्रकारच्या कलात्मक वस्तूंचे संग्रह करणे आणि अतिश्रीमंत हौशी व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून ही मोटारसायकल तयार करण्यात आली आहे. अभियांत्रिकीचे चांगले ज्ञान आणि कुशल कारागिरांच्या मदतीने मोटारसायकलीच्या प्रत्येक भागावर कलाकुसर करून प्रत्येक भाग जोडण्यासाठी अनेक महिने लागले.


अचूकता आणि दर्जा राखण्यासाठी प्रत्येक भाग लेझर कटच्या साहाय्याने बनवण्यात आला आहे. आहे. ही पद्धत महागडी असली तरी इतर प्रोफायलिंग पद्धतींच्या तुलनेत अधिक उत्तम आहे असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल मेहता यांनी सांगितले.


कोणत्याही आघाडीच्या ब्रॅँडबरोबर संबंधित ग्राहकाच्या गरजेनुसार अगदी डिझाइन ते प्रत्यक्ष मोटारसायकल सहा महिन्यांच आत बनू शकते, असे सांगून कस्टमायझेशननुसार 50 लाख रुपये ते एक कोटी रुपयांच्या (85,000-170,000 डॉलर) आसपास असण्याची शक्यता मेहता यांनी व्यक्त केली. गोरेगाव येथील एनएसई संकुलामध्ये 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीत ही चमचमती मोटारसायकल बघता येऊ शकणार आहे.