आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय इंजिनिअर्सच्या जोरावर अ‍ॅपलची घोडदौड सुरू; कंपनीतील प्रत्येक तिसरा इंजिनिअर भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेली अमेरिकेची कंपनी अ‍ॅपलचे नाव सर्वांनीच ऐकले असेल. टेक्नोसॅव्ही असलेला प्रत्येक जण या कंपनीच्या उत्पादनांचा दिवाणा आहे. आयफोन म्हटले तर स्मार्टफोन युजर्सच्या गळ्यातला ताईतच. मात्र तुम्हाला माहिती आहे का 171 अब्ज डॉलरच्या या महाकाय कंपनीमधील एक तृतीयांश इंजिनिअर हे भारतीय आहे. एवढेच नव्हे तर या कंपनीला सॉफ्टवेअर, सर्व्हीस आणि सपोर्ट करणार्‍या अनेक कंपन्या ह्या भारतातीलच आहेत.
भारताच्या अनेक आय.टी. व्हेंडर कंपन्या अ‍ॅपलसोबत जोडल्या गेल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या अहवालामुसार अमिरेकेत असलेल्या एचएचएस रिसर्चने यासंबंधीची अकडेवारी एकत्रित केली आहे. एच-1बी विसा घेणार्‍यांमध्ये सर्वात जास्त भारतीय असतील. याचाच अर्थ असा की, आयफोन आणि आयपॅड बनवणार्‍या या कंपनीला भारतीय इंजिनिअर्सची मोठ्या प्रमाणात गरज पडू शकते.
या संशोधन संस्थेचे मुख्य विश्लेषक पॅरिक जॅन यांनी सांगितले की, अ‍ॅपलमध्ये काम करणार्‍या इंजिनिअर्सपैकी एक तृतीयांश इंजिनिअर हे भारतीय आहे. ज्यांच्याजवळ एच-1बी विसा अथवा ग्रीन कार्ड आहे.
संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल भारतातील कमीत कमी पाच आयटी व्हेंडर्स सोबत काम करत आहे. यामधील 4 कंपन्या या देशातील सर्वात मोठ्या कंपन्या आहे. तसेच या कंपन्यांकडील कामाचा व्याप वाढतच आहे. मात्र या अ‍ॅपलने या कंपन्यांची नावे सांगण्यास कंपनीने नकार दिला आहे. तरीही भारतातील इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या कंपन्या असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, अ‍ॅपलच्या उत्पादनांबद्दल