आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सचा ‘वन इंडिया वन रेट’; लोकल, एसटीडी, रोमिंगसाठी एकच दर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आर कॉम) वन इंडिया वन रेट ही नवी योजना सोमवारी सादर केली. या योजनेनुसार मोबाइल ग्राहकांकडून स्थानीक, एसटीडी आणि रोमिंगसाठी एकच दर आकारण्यात येणार आहे. आर-कॉमने पोस्टपेड प्रकारात 599 रुपये आणि 350 प्रतिमहिना असे दोन पर्याय तर प्री पेड साठी 45 रुपये असा पर्याय दिला आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे ग्राहक विझनेस विभागाचे सीईओ गुरदीप सिंग यांनी सांगितले, स्थानीक, एसटीडी आणि रोमिंग कॉलसाठीच्या दरातील फरक कमी करणारी वन इंडिया वन रेट ही योजना उपयुक्त ठरणारी आहे. यात सर्व ग्राहकांसाठी रोमिंगमध्ये इनकमिंग कॉल मोफत राहतील तर आउटगोईंग कॉलसाठी स्थानीकनुसार दर राहतील.

असे आहेत प्लॅन
० 599 रुपये प्रतिमहिना : ग्राहकांना 1200 मिनिटे मोफत आउटगोइंग (रोमिंग, एसटीडी, लोकल), अमर्याद नॅशनल इनकमिंग रोमिंग मोफत, दोन जीबी डाटा व 100 एसएमएस मोफत, आउटगोइंगसाठी 30 पैसे प्रतिमिनिट दर (मोफत वापर मर्यादेनंतर)

० 350 रुपये प्रतिमहिना : ग्राहकांना 700 मिनिटे मोफत आउटगोइंग (रोमिंग, एसटीडी, लोकल), 200 मिनिटे नॅशनल इनकमिंग रोमिंग मोफत, एक जीबी डाटा व 100 एसएमएस मोफत, आउटगोइंगसाठी 40 पैसे प्रतिमिनिट दर (मोफत वापर मर्यादेनंतर)

० प्री-पेड : 45 रुपयांत महिना वैधता, रोमिंग इनकमिंग मोफत, आउटगोइंग 40 पैसे