आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका वर्षात सोन्याने दिला 36 टक्क्यांचा परतावा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या झळाळीला तेजीचे अनोखे तेज लाभले. त्यामुळे देशातील सराफा बाजारात सोन्याने 30 हजारांचा टप्पा लीलया पार करत नवा विक्रम केला. स्थानिक बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून 28,500 ते 29,800 रुपये प्रतितोळा या पातळीत फिरत होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीने या मौल्यवान धातूने 30 हजारांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षभरात सोन्याने 36 टक्के परतावा दिला आहे.
का आली तेजी : आंतरराष्ट्रीय बाजारात सोेन्याच्या भावात प्रतिऔंस मोठी वाढ होत सोन्याने 1664 डॉलर्सचा टप्पा गाठला. एमसीएक्स वायदे वाजारात 5 जुलैसाठी 29,690 रुपयांपर्यंत सौद्यांची बोली झाली. क्रूड तेलाच्या किमतीत प्रचंड घसरण होऊन भाव प्रति बॅरल 83 डॉलरपर्यंत खाली आले. रुपयाच्या तुलनेत मजबूत होणाºया डॉलरला रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत मिळत असल्यानेही सोन्याच्या तेजीला हातभार मिळत आहे.
अचानक वाढले भाव : आंतरराष्ट्रीय बाजार उघडताच सोन्यात मोठी तेजी आली. त्यामुळे स्थानिक सराफ्यात सोने 30,050 रुपये प्रतितोळाने विक्री झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात अचानक 100 डॉलरहून अधिक उसळी दिसून आली. अचानक या मौल्यवान धातूकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला. आगामी काळातही सोन्यात अशाच प्रकारच्या तेजीचे संकेत आहेत.
एक वर्षात भावात 8000 ची वाढ
1 जुलै 11 22,000 रु. प्रतितोळा
13 जुलै 11 23,000 रु. प्रतितोळा
6 ऑगस्ट 11 24,000 रु. प्रतितोळा
8 ऑगस्ट 11 25,000 रु. प्रतितोळा
11 ऑगस्ट 11 26,000 रु. प्रतितोळा
18 ऑगस्ट 11 27,000 रु. प्रतितोळा
28 ऑक्टोबर 11 28,000 रु.प्रतितोळा
14 नोव्हेंबर 11 29,000 रु. प्रतितोळा
1 जून 12 30,000 रु. प्रतितोळा
आता सोने घ्या चोरीस जाण्याच्या भीतीशिवाय
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदीसाठी पॅन आवश्यक
सोने, प्लॅटिनम - फायदेशीर गुंतवणूक