आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओनिडातर्फे प्रथमच पांढ-या रंगाचा एलईडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये अग्रेसर असणा-या ओनिडाच्या वतीने पांढ-या रंगाचा एलईडी प्रथमच बाजारपेठेत सादर केला जाणार आहे, अशी माहिती ओनिडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. एल. मिरचंदानी यांनी येथे ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे मॉडेल ग्राहकांसमोर येईल, असेही ते म्हणाले. ओनिडातर्फे इन्व्हर्टर एअर कंडिशनर्सची नवी श्रेणी आज बाजारात सादर करण्यात आली. यानिमित्ताने ते बोलत होते.

कंपनीचे विपणन उपाध्यक्ष विपुल माथूर तसेच पश्चिम विभागाचे व्यवस्थापक के. आर. सिंग या वेळी उपस्थित होते.
स्मार्ट इन्व्हर्टर्सच्या या श्रेणीत 0.8 टीआर ते दोन टीआर या क्षमतेतील तब्बल 32 मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत, असे सांगून मिरचंदानी म्हणाले, कलर फ्लॅट, प्रीकूल आणि आय कूल अशी तीन श्रेणीत ही मॉडेल्स उपलब्ध असून किमती वीस ते 65 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. इनोव्हेशन ही संकल्पना ओनिडाने सातत्याने अंगीकारली आहे.

याआधीही कंपनीने प्रीकूल एसी, स्पीड कूल एसी, मल्टी फ्लो एसी आणि ट्विन कूल एसी अशी अभिनव उत्पादने सादर केली होती. स्मार्ट इन्व्हर्टर एसी ही त्यापुढील मालिका आहे. याआधीच्या उत्पादनांप्रमाणेच ही नवी मालिकाही उत्तम प्रतिसाद मिळवेल. नवी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने 50 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. सध्या या क्षेत्रात कंपनीचा 14 टक्के हिस्सा आहे. भविष्यात नवनवीन उत्पादने सादर करण्याची योजना असल्याने हा हिस्सा वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबादेत प्रकल्प
ओनिडाचा आगामी घरगुती उपकरणांसाठीचा प्रकल्प औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागेची, तसेच अन्य सुविधांची चाचपणी करण्याचे काम सुरू आहे. अद्याप जागा निश्चित झाली नसून इतर आवश्यक गोष्टीही प्राथमिक स्तरावर आहेत. मात्र, कंपनीने सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. एल. मिरचंदानी यांनी स्पष्ट केले.

इन्व्हर्टर एसीचा स्मार्टनेस
> 0.8 ते दोन टीआर क्षमतेची 32 मॉडेल्स
> कलर फ्लॅट, प्रीकूल, आयकूल अशा तीन श्रेणी
> किंमत 20 ते 65 हजारांपर्यंत
> भारतीय बाजारपेठेत प्रथमच पांढ-या रंगाचा एलईडी आणणार
> इन्व्हर्टर एसीमध्ये फास्ट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
> बाजारपेठेतील 14 टक्के हिस्सा वाढवणार
> मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत
> वितरकांचे जाळे विस्तारणार