आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओनिडा औरंगाबादेत उभारणार 400 कोटी रूपयांचा प्रकल्‍प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेतील आघाडीच्या ओनिडा कंपनीने ४०० कोटी रुपये गुंतवून महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये घरगुती उपकरण उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतल्‍याची माहिती ओनिडा आणि आयजीओ ब्रँडची मालकी असलेल्या मार्क इलेक्ट्रोनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक गुल्लू मिरचंदानी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

नव्या पिढीतील ग्राहकांची आवड लक्षात घेऊन बेडरुममध्ये ठेवता येईल असा शुभ्र रंगाचा एलइडी टीव्ही कंपनी लवकरच बाजारात आणणार आहे. त्याची २४ इंची मॉडेलची किंमत १४ हजार ९०० रुपये असेल. याखेरीज विजेची वर्षाला ५० हजार रुपयांची बचत करणारे एअरकंडीशनर बाजारात आणले जात आहेत. याची किमत श्रेणी 19990 ते 64,990 रुपये असेल. खोलोतील तापमानावर देखरेख ठेवणारे फास्ट तंत्र वापरलेले एसी हे वैशिष्ट्य असून त्याचे पेटंट घेण्यात आले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना सामोरे जाण्यासाठी ग्राहकांना सतत नवीन तंत्र वापरलेली उत्पादने देण्यावर कंपनीचा भर देणार आहे.

या नव्या तंत्राची माहिती देताना गुल्‍लू मिरचंदानी म्‍हणाले की, सेल फोनवरून एसएमएस पाठवून प्रिकुलिंग करू शकणारा एसी, दोन खोल्या असतील तर त्यांना पुरेसा ठरणारा ट्विन कुल एसी, वेगाने थंडावा निर्माण करणारा एएसी ही कंपनीची खास तंत्रे आहेत. सध्या एसी बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा १४ टक्के असून २०१५ पर्यंत उलाढाल १००० कोटी रुपये करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.


(फोटो- डावीकडून विपुल माथूर (व्‍हाईस प्रेसिडंट- मार्केटिंग), जी एल मिरचंदानी (चेअरमन आणि मॅनेंजिग डायरेक्‍टर, मार्क इलेक्‍ट्रानिक्‍स लि.), कुंवर राज सिंग (रिजनल मॅनेजर वेस्‍ट)