आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Export Control, Government Prohibited And Export Decline 81 Percent

कांदा निर्यातीला वेसण,सरकारच्या नियंत्रणामुळे ऑगस्टच्या निर्यातीत 81% घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील भडकलेल्या कांद्याच्या किमतीचे नियंत्रण तसेच बाजारातील पुरवठ्याचे प्रमाण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विदेशातील विक्रीवर बंदी आणली आहे. याचा परिणाम म्हणजे ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीत लक्षणीय 81 टक्क्यांनी घट होऊन ती 29,247 टनांवर आली आहे.


किरकोळ बाजारात कांद्याने किलोमागे 80 रुपयांची कमाल पातळी गाठली होती. कांद्यांच्या किमतीबरोबरच निर्यातीला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यासाठी प्रतिटन 650 डॉलर अशी किमान निर्यात किमत निश्चित केली. त्यानंतर देशाच्या बहुतांश भागात कांद्याच्या किमती 50 ते 60 रुपये किलोच्या आसपासच घुटमळत होत्या. ‘नाफेड’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षातील 1,56,283 टनांच्या तुलनेत कांदा निर्यात कमी होऊन यंदाच्या ऑगस्ट महिन्यात ती 29,247 टनांवर मर्यादित राहिली. मूल्य स्वरूपातही ही निर्यात घसरून अगोदरच्या वर्षातल्या याच आढावा कालावधीतील 164.92 कोटी रुपयांवरून आता 125.46 कोटी रुपयांवर आली आहे. पुरवठ्याच्या स्थितीवर आगामी निर्यातीची स्थिती अवलंबून राहणार असल्याचे मत कांदा व्यापा-यांनी व्यक्त केले आहे.