आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर! कांदा 9 रुपये प्रति किलो; ऑनलाईन ऑर्डर केल्याने घरपोच मिळेल डिलिव्हरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी द‍िल्ली- यंदा कांद्याच्या किमतीने देशातील जनतेला चांगलेच रडवले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिकिलो 80 रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या कांदा 50 रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. परंतु तुमच्यासाठी खुशखबर आहे. एका ऑनलाईन शॉपने कांदा प्रत‍िकिलो 9 रुपयाने उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन ऑर्डर दिल्यास तुम्हाला घरपोच डिलिव्हरीही मिळणार आहे.

'ग्रुपऑन इंडिया'चे सीईओ अंकूर वारिकू यांनी सांगितले, की आमचा व्यवहार अत्यंत सुलभ आहे. कांद्याच्या किमती जेव्हा वाढतात, तेव्हा आम्ही आमच्या यूझर्सला 9 रुपये प्रतिकिलोप्रमाणे कांदा उपलब्ध करून देत असतो. ऑनलाईन ऑर्डर करणार्‍या ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी दिली जाते. वेबसाईटवर नोंदणी केलेल्या यूझर्सलाच हा लाभ घेता येईल, असेह वारिकू यांनी सांगितले. एका यूझर्सला केवळ एकच ऑर्डर करता येईल.

कांदा 9 रुपये प्रतिकिलो? विश्वास नाही बसला ना! पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, काय आहे ऑफर, नियम आणि अटी?