आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात पाणी आणणारा कांदा आला 4.70 रूपये क‍िलोवर,यंदाची नीचांकी पातळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहा महिन्यांपूर्वी भावाच्या शतकाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा बुधवारी नाशकातील घाऊक बाजारात 4.70 रुपये किलो अशा नीचांकी पातळीवर आला. सातत्याने वाढणारी आवक आणि निर्यातीतील अपेक्षित घट यामुळे कांद्याच्या किमती घसरल्या. देशभरातील कांद्याचे भाव निश्चित करणा-या नाशिक बाजारपेठेत ऑक्टोबर 2013 मध्ये कांदा 100 रुपये किलो होता.
यासंदर्भात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी सांगितले, बाजारात खरिपाचा कांदा मुबलक प्रमाणात आहे. त्यातच गरवा कांद्याची आवक जानेवारीपासून सुरू झाल्याने मागणी कमी आणि पुरवठा जास्त यामुळे कांदा घसरला. चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंतची 4.70 रुपये प्रतिकिलो अशी पातळी कांद्याने गाठली. व्यापा-यांनी सांगितले, कांदा निर्यात घसरल्याचा परिणाम देशातील बाजारात दिसून येत आहे. कांद्याला उठाव नसल्याने किमती घसरल्या. अजित शहा या व्यापा-याने सांगितले, इतर देशांतील कांद्याची आवक झाल्याने भारतातून होणारी कांदा निर्यात 10 ते 15 टक्क्यांनी घसरली. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात कांदा निर्यात 30 टक्क्यांनी घटली. याच काळात कांदा निर्यात 14.04 लाख टनांवरून 9.87 लाख टनांवर आली. गेल्या वर्षी (2012-13) देशातून 18.22 लाख टन कांदा निर्यात झाला होता.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने कांदा निर्यातीचे किमान मूल्य 150 डॉलर प्रतिटनावरून 350 डॉलर प्रतिटन केले होते. किमान निर्यात मूल्यात केलेली ही तिसरी कपात होती. देशाअंतर्गत बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना निर्यात कमी व्हावी व देशातील बाजारातील कांदा आवक वाढावी यासाठी किमान निर्यात मूल्य वाढवण्यात आले होते.