आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा रडवून घसरला,आता टोमॅटो डोळे लाल करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातील नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शहरातील बाजारात टोमॅटोचा किरकोळ विक्रीचा दर प्रतिकिलो 60 रुपये असून कांदा प्रतिकिलो 30 रुपये दराने विक्री होत आहे. पिंपळगाव बाजार समितीत प्रति केट्र 1021 रुपये तर नाशिक बाजार समितीत टोमॅटो 951 रुपये प्रति क्रेट दराने विक्री झाले. त्यामुळे ग्राहकांकडून मध्यम प्रतीच्या टोमॅटोला मागणी होत आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तानात निर्यात होणार्‍या टोमॅटोची मागणी काही आठवड्यांपूर्वी घटली होती. मात्र पुन्हा पाकिस्तानात मागणी वाढली असल्याने टोमॅटोचे दर वधारले आहेत. मात्र सध्या बांगलादेशाला टोमॅटो पाठवण्यासाठी निर्यातदारांनी वाढत्या करामुळे पाठ फिरविली आहे. पिंपळगाव, गिरणारे, नाशिक बाजार समितीमध्ये टोमॅटो प्रतिक्रेट 800 ते 951 या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही टोमॅटो पुन्हा 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे. मात्र टोमॅटो खरेदीकडे ग्राहकांनी दुर्लक्ष केल्याने विक्रेत्यांनी खरेदी केलेला टोमॅटो तसाच शिल्लक राहत आहे.
4कांद्याप्रमाणे टोमॅटो इतका आवश्यक नसल्याने ग्राहक टोमॅटोची मागणी करीत नाही. दर वाढल्याने ग्राहक टोमॅटोची खरेदी करणार नाही. त्यामुळे मध्यम प्रतीचा टोमॅटो विक्रीला ठेवण्यात येतो. सचिन चवळे, किरकोळ विक्रेते
कांदा कोसळला
किरकोळ बाजारात कांद्याचे भाव कमी झाले असले तरी टोमॅटो, लसूण आणि काकडीचे भाव वाढले आहेत. यामध्ये टोमॅटो उच्च् प्रतीचा 60 रुपये किलो, मध्यम प्रतीचा 40 रुपये किलो, लसूण 80 ते 100 रुपये किलो, काकडी 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे.
टोमॅटोची आवक नसल्याने दरवाढ
टोमॅटोच्या मागणीप्रमाणे आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. इतर राज्यात टोमॅटोचे पीक आल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब महाले,टोमॅटो व्यापारी
पाकिस्तानने बंद केलेल्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. निर्यातीत वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. गोपीभाई मणियार, टोमॅटो व्यापारी