आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा महागणार 45 रुपयांनी, नांदगावात हंगामातील 3731 रुपये सर्वोच्च भाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दरात वाढ होत असल्याने बाजारात 40 रुपये रुपये दराने कांद्याची विक्री होत असली तरी बाजारसमितीत कांद्याच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ बाजारात हेच भाव 45 रुपयांवर पोहोचण्यासाठी शक्यता आहे. नांदगाव बाजारसमितीत कांद्याला हंगामातील सर्वाधिक क्विंटलला 3 हजार 731 रुपये दर मिळाला आहे. सरासरी दर हे 3 350 तर 3400 रुपये प्रतिक्विंटल दर होते.


ढगाळ हवामानाचा अंदाज असल्याने शेतक-यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणला आहे. गुरुवारी हंगामातील कांद्याला सर्वाधिक दर प्राप्त झाला आहे. नांदगाव बाजारसमितीत 3 हजार 751 सर्वाधिक तर सर्वाधिक कमी 711 रुपये चांदवड येथील बाजारसमितीत प्राप्त झाला. शुक्रवार रोजी ईदमुळे काही बाजारसमित्या सुरू तर काही बंद असतील. शनिवार आणि रविवारी बाजारसमित्या बंद राहणार असल्याने किरकोळ बाजारात कांद्याची आवक कमी असणार आहे. त्यामुळे कांदा 45 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.