आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Price News In Marathi, Export Growth, Divya Marathi

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले,निर्यातवाढीला चालना देण्यासाठी पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कांदा निर्यातीला अधिक चालना मिळावी व कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) हटवले आहे. सप्टेंबर 2013 मध्ये देशात विविध ठिकाणी कांद्याचे भाव 100 रुपयांवर पोहोचले होते, तेव्हा सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य लादले होते. त्यानंतर त्यात वेळोवेळी वाढ-घट केली होती.
विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी सांगितले, कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्यात आले आहे. डिसेंबर 2013 मध्ये निर्यात मूल्यात घट करून ते टनामागे 150 डॉलरवर आणले होते. सप्टेंबरमध्ये देशातील विविध बाजारपेठांत कांदा किलोमागे 100 रुपयांवर पोहोचला होता.


कांदा उत्पादकांची मागणी
देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. यंदाच्या हंगामात कांद्याचे उत्पादन चांगलेच वाढल्याने कांदा निर्यातीवरील निर्बंध हटवावेत, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली होती.