आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Onion Price News In Marathi, October, Narendra Modi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्टोबरमध्ये कांदा सर्वांना रडवणार, कांदा होणार 100 रूपये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी काळात कांद्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये कांदा सर्वांना रडवण्याची शक्यता आहे. त्या वेळी कांद्याच्या किमती 100 रुपये प्रतिकिलो होण्याची दाट शक्यता आहे.

एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कांदा सर्वसामान्यांपासून दूर राहील. ऑक्टोबरमध्ये कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत कांद्याचे भाव वाढून किलोमागे 25 ते 30 रुपये झाले आहेत. मागील पंधरवड्यात दिल्लीत कांदा 15 ते 20 रुपये किलो दराने मिळत होता.

केंद्र सरकारच्या मते कांद्यावरील किमान निर्यातमूल्य लावल्याने देशातील बाजारात कांद्याच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या मते, कांद्यावर किमान निर्यातमूल्य लादल्याने देशातील बाजारात कांद्याच्या किमतीवाढीला आळा बसणार आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती स्थिर राहतील. हे शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचे आहे. कांदा निर्यातीला आळा बसावा आणि देशातील कांद्याच्या किमतीतील तेजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर टनामागे 300 डॉलर किमान निर्यात मूल्य लावले आहे.