आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Commodity Trading Has Become Easy Nowadays

कमोडिटी ट्रेडिंगची सुसंधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन माणूस शेअर बाजार प्रकरणापासून अजूनही फारच दूर दूर राहतो. खरं तर आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. आता शेअर बाजार संपूर्णत: ऑनलाइन झाला आहे. त्यात पारदर्शकता निर्माण झाली आहे. हिशेबात सुरळीतपणा आणि अचूकता आली आहे. सर्व व्यवहार म्हणजेच खरेदी-विक्री, ब्रोकरेज, टॅक्स, जमा-खर्च इत्यादींबाबत सर्वच गोष्टी आपल्याला आपल्या कमोडिटी ट्रेडिंग खात्यात घरीच इंटरनेटद्वारे संगणकावर पाहावयास मिळतात. या सुविधा तर आहेतच, पण आपण आपल्या हाताने खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊन सौदे करू शकतो. यासाठी फार मोठ्या प्रशिक्षणाची गरज नाही.

भारतीय शेअर बाजार म्हणजेच एनएसई व बीएसईमध्ये जशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाऊ शकते त्याचप्रमाणे एमसीएक्स व एनसीडीईएक्स एक्स्चेंजमध्ये कमोडिटीजच्या व्यवहाराची खरेदी-विक्री करता येऊ शकते. कमोडिटी म्हणजेच उपयुक्त वस्तू, व्यापारी माल इ. या कमोडिटी मार्केटीचे वैशिष्ट्ये म्हणजे आपण आपल्याकडे असलेल्या गुंतवणूक क्षमतेनुसार व गरजेनुसार व्यवहार करू शकतो. हे सर्व व्यवहार आपल्या खात्यावर (अकाउंट) होतात. यामध्ये काय खरेदी केले, काय भावाने खरेदी केले, विक्री केले याबाबतचा सर्व तपशील उपलब्ध असतो.

100 टक्के रक्कम असणे अनिवार्य नाही
सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या कमोडिटी खरेदी-विक्री व्यवहारात आपल्याकडे 100 टक्के रक्कम असणे अनिवार्य नसते, तर केवळ 10 ते 15 टक्के रकमेवरही आपण व्यापारी सौदे करू शकतो. हा व्यापारी सौदा पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी म्हणजेच एक महिना ते तीन महिन्यापर्यंतचा वेळ दिलेला असतो. आपल्याला यापेक्षा जास्त कालावधी लागत असल्यास रोल-ओव्हरदेखील करता येते. तोटा नियंत्रित ठेवण्यासाठी स्टॉप लॉसदेखील लावता येतो. कमोडिटी मार्केटच्या व्यवहारात भाव कमी होत असताना किंवा वाढत असताना दोन्हीही वेळेस नफा कमावता येतो. म्हणजेच आपण पूर्ण विचारांती निर्णय घ्ोऊन या बाजारात उतरलो तर निश्चितच नफा मिळवू शकतो.

एक पैसादेखील कोणी काढू शकत नाही
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले कमोडिटी खाते इतके सुरक्षित असते की, यातील एक पैसादेखील कोणीही काढू शकत नाही. आपल्या कमोडिटी खात्याला आपले एक सेव्हिंग बँक खाते जोडून द्यावे लागते. या कमोडिटी खात्यातील पैसे केवळ त्याच सेव्हिंग खात्यात जमा होतात. आपण स्वत:देखील आॅनलाइन खाते असूनदेखील इतरत्र ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजेच आपला पैसा फक्त आपल्याच खात्यात राहतो.

व्यापारी सौदे करताना कोठे प्रवेश करावा व कोठून बाहेर पडावे याचे अचूक ज्ञान, माहिती जर व्यापारी सौदा (ट्रेड) चुकीच्या वेळी घेतला किंवा चुकीच्या वेळी बाहेर पडलो तर नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजेच कमीत कमी चुका होऊन नफ्याचे प्रमाण वाढू शकते. सौदा करताना अनुभव, अभ्यास आणि तांत्रिक विश्लेषण आवश्यक ठरते.

कमोडिटीमध्ये आपण सोने, चांदी, तांबे, जस्त, अ‍ॅल्युमिनियम इ. धातू तसेच नैसर्गिक वायू, खनिज तेल या ऊर्जा क्षेत्रात व शेतीविषयक हरभरा, जिरे, कापूस, सोयाबिन इ. विविध उत्पादनांमध्ये आपण सौदे करू शकतो. अर्थात आपल्याला माहिती असलेल्या आणि ज्ञान असलेल्या क्षेत्रातच सौदे केले तर फायदेशीर ठरू शकतात. याबाबत अनेक दिशादर्शक (इंडिकेटर), चार्ट, फंडामेंटल न्यूज आपल्या मदतीला असतात. इतकेच काय, पण याबाबत बाजारात टिप्स देणार्‍या संस्थादेखील कार्यरत आहेत. यापुढे जाऊन काही अभ्यासक तर आता (कमोडिटी ट्रेड) व्यापारी सौद्यामध्ये केव्हा प्रवेश करावा व कोठे बाहेर पडावे याबाबत अतिशय माफक सेवा शुल्क आकारून मार्गदर्शन करतात. कमोडिटी मार्केटमध्ये आपण स्वत: अभ्यास करून अनुभव येईपर्यंत अशा सल्लागारांची मदत घेणे नेहमीच व्यवहार्य ठरते. याबाबत एक व्यावहारिक उदाहरण मी देऊ इच्छितो ते असे :

दरवर्षी शेतीमाल बाजारात आला की त्याचे भाव कमी होतात. म्हणजेच मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने भाव कमी होतात व पेरणीच्या वेळी साठा कमी झाल्यामुळे भाव वाढतात. हे नेहमीच अनुभवास येते. जेव्हा भाव कमी असतो त्या वेळी एकादा व्यापारी सौदा 10 ते 15 टक्के रक्कम गुंतवणूक करून करावा व त्यानंतर भाव वाढेपर्यंत म्हणजेच पुढील 5 ते 7 महिने तो सौदा रोल-ओव्हर करत करत भाव वाढल्यानंतर बंद करावा.

यामध्ये आपणास आपण गुंतवलेल्या रकमेच्या दुपटी-तिपटीपेक्षा जास्त फायदा 5 ते 7 महिन्यांत होऊ शकतो. म्हणजेच बँकेतील एफडीसाठी (दीर्घ मुदतीच्या ठेवी) आपण 7 ते 8 वर्षेपर्यंत थांबू शकतो, तर येथे 5 ते 7 महिने थांबणे जास्त फायदेशीर ठरू शकते.

अतिशय अचूक निर्णय, थोडेसे धाडस आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कमोडिटी मार्केटमध्ये खूप मोठे आर्थिक यश मिळवणे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन माणसास अलिबाबाच्या गुहेप्रमाणे उघडे होईल व आर्थिक क्षेत्रात तो आत्मविश्वासाने वावरू शकेल याबाबत शंका नाही.

कमोडिटीमधील सौदे
कमोडिटीमध्ये आपण आपण सोने, चांदी, तांबे, जस्त, हरभरा, जिरे, कापूस, सोयाबिन इ. विविध उत्पादनांमध्ये सौदे करू शकतो.