Home | Business | Gadget | online data with storage sites

डाटासोबत ऑनलाईन स्टोअरेज साइट्सचा रेटा!

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Update - Jun 10, 2011, 03:51 AM IST

ज्या वेळी दोन कॉम्प्युटरसोबत काम करायचे होते तेव्हा फाईल शेअरिंग करणे हा कळीचा मुद्दा नव्हता

  • online data with storage sites

    नवी दिल्ली- मोबाइल डिव्हाइस आणि ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटीज्मध्ये वाढ झाल्याने ऑनलाईन डाटा स्टोअरेजची गरज भासू लागली. या संधीचा फायदा उचलण्यासाठी किती तरी कंपन्या पुढे सरसावल्या आहेत आणि यूजर्सना चांगल्या सुविधा देऊ लागल्या आहेत. या कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धाही जुंपली आहे. लोकांना ज्या वेळी दोन कॉम्प्युटरसोबत काम करायचे होते तेव्हा फाईल शेअरिंग करणे हा कळीचा मुद्दा नव्हता. आता मोठ्या नेटवर्कमध्ये काम करणे आणि त्या अनुषंगाने डाटा स्टोअर करणे ओघाने आलेच. हे काम तसे सोपे नाही, पण काही वेबसाइट्सनी त्याला सोपे केले आहे.

Trending