आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Rail Tickets Sold News In Marathi, Indian Railway, 5.80 Million In One Day

रेल्वेची रेकॉर्डब्रेक ऑनलाईन तिकिट विक्री; एका दिवसात 5.80 लाख तिक‍िटे झाली बूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- समर व्हॅकेशनसाठी भारतीय रेल्वे बुक‍िंग सुरु केली आहे. रेल्वेने पुन्हा एकदा ऑनलाईन तिकिट विक्रीचे मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. बुधवारी (19 मार्च 2014) रेल्वेने ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 5.80 लाख तिकिट विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. यापूर्वी दोन सप्टेंबर 2013 ला 5.72 लाख ऑनलाईन तिकिटे विक्रीचा रेकॉर्ड केला होता.

गेल्या बुधवारी रात्री 5.80 लाख ऑनलाईन तिकिटे बुक झाल्याचे इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) एक वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. यात स्लीपरसह वातानुकूलित श्रेणीतील तिकिटांचा समावेश आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दररोज 4.63 लाख पेक्षा जास्त तिकिटे विक्री होतात. मात्र आता उन्हाळ्याच्या सुट्यांची बुकिंग सुरु आहे. विशेष म्हणजे रेल्वेची 50 टक्क्यांहून अधिक तिकिटे ऑनलाईन विकली जातात.