आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल १.२३ कोटी जनतेने भरला ऑनलाईन रिटर्न; गेल्या वर्षीच्या तुलनेत 68 टक्क्यांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाईन भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाईन रिटर्न भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत तब्बल ६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा १.२३ कोटी करदात्यांनी ऑनलाईन रिटर्नला पसंती दर्शविली आहे.

ऑनलाईन रिटर्न भरण्याला करदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. अखेरच्या दिवशी ५ ऑगस्ट रोजी ६.९२ लाख करदात्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. देशातील सुमारे ८७ लाख करदात्यांनी ऑनलाईन रिटर्न भरलेला आहे.

गेल्या वर्षी ऑनलाईन रिटर्न भरणाऱ्यांची संख्या ७३.११ लाख होती. या वर्षी १.२३ कोटी करदात्यांनी ऑनलाईन रिटर्न भरल्याचे प्राप्तिकर खात्याने जाहीर केले आहे. पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना ऑनलाईन रिटर्न भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.