नवी दिल्ली- सोमवारी (6 ऑक्टोबर) flipkart ने
आपल्या वेबसाइटवर ‘बिग बिलियन डे’ ही ऑफर देऊन सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. flipkart ने ही बिग ऑफर देऊन अवघ्या 10 तासांत सुमारे 615 कोटी रुपयांचा बिझिनेस केला. यासोबत एक अब्ज हिट्स देखील मिळवल्या. मात्र, लोकांची इतकी झुंबड पडली की, flipkart ची साइट क्रॅश झाली.
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक दिवशी बचतीच्या ऑफर्स देत आहेत. देशात ऑनलाइन रिटेलर्स छोट्या व्यवसायिकांना मदत करताना दिसतात. मायक्रो, स्मॉल अॅण्ड मीडियम एंटरप्राइझेसचे (एमएसएमय) उत्पादन ऑनलाइन विक्रीसाठी ट्रेनिंग देण्यासाठी सरकारसोबत करार केले जात आहेत. यामुळे 'एमएसएम'ला तर फायदा होतोच सोबत बिझिनेसला एक नवी दिशा मिळते.
असे करा रजिस्ट्रेशन...
=> विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर आपल्या व्यवसायाचे अगदी मोफत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येते.
=> रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संबंधित वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये आपले प्रॉडक्ट ऑनलाइन डिस्प्ले करता येते.
=> डिस्प्ले केल्यानंतर तुमच्या प्रॉडक्टला ऑर्डर मिळाल्यानंतर त्याची पॅकेजिंग, शिपिंग, ट्रॅकिंग आणि डिलिव्हरी करण्याची जबाबदारी संबंधित ई-कॉमर्स कंपनीची असते.
=> प्रॉडक्टच्या विक्रीवर या कंपन्या निर्धारित केलेले कमिशन घेतात. तसेच पॅकेजिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंतच्या खर्चावर सर्व्हिस चार्ज घेतले जाते.
amazon वर आपले प्रॉडक्ट्स ऑनलाइन विक्रीचे लाभ वाचण्यासाठी पुढील स्लाइड्स क्लिक करा...