आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठ्या मंदीतही फक्त मारुतीच तेजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहा वर्षांतील सर्वात मोठ्या मंदीचा सामना करणा-या भारतीय कार बाजारात मारुतीनेच दहा लाखांहून अधिक कारची विक्री करत व्यापारवृद्धी केली. 2012 मध्ये हरियाणातील मनेसर प्रकल्पात झालेल्या नुकसानीनंतर कारनिर्मिती तोट्यातच होती. त्यामुळे अडीच हजार कोटींचे नुकसान झाले होते.
छोट्या कार : कंपनीने लहान आकाराच्या कारवरच लक्ष केंद्रित केले. मारुतीकडे पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 9 कार आहेत. अल्टो 800, व्हेन ते वॅगनआरपर्यंत. दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाईकडे छोटी कार श्रेणीत फक्त इयॉन किंवा आय 10 आहे.
खेडोपाडी पोहोचली : गेल्या तीन वर्षांत कंपनीने ग्रामीण बाजारातील वाटा दहावरून 30 टक्क्यांवर पोहोचवला. यासाठी ढाबे, प्रगत शेतक-यासह छोटा-मोठा उद्योग करणा-यापर्यंत पोहोचली. पुढील दोन वर्षांत एक लाख गावांत पोहोचण्याचे धोरण कंपनीने आखले आहे.