आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- ओपल लक्झरी टाइम प्रोडक्ट या कंपनीने प्राथमिक भागविक्री करून १३ कोटी रुपये उभारण्याचे ठरविले असून इमर्ज या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी असलेल्या बाजारावर नोंदणी होणारी पुण्यातील ही पहिली कंपनी असेल, अशी माहिती कंपनीचे मुख्याधिकारी संजय गोयल यांनी दिली.
येत्या २५ मार्चपासून भागविक्री सुरु होणार असून त्यासाठी किंमत पट्टा प्रतिशेअर १३०-१३५ रुपये निश्चित केला आहे. किमान एक हजार शेअर्सला अर्ज करावा लागणार आहे. दर्शनी किमत दहा रुपये आहे. प्रिमिअम घड्याळांच्या बाजारपेठेत कंपनी असून मोल्ड, टूल, साधने यासाठी रक्कम वापरली जाणार आहे. उत्तराखंड राज्यात उत्पादन प्रकल्प असून अमेरिकेला निर्यातही केली जाते. सध्या सुटे भाग आयात केले जातात मात्र मोल्ड, टूल, साधने देशात विकसित झाल्यास अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून उत्पादनाची किमत कमी होणार आहे. सध्या १२ ऑनला इन पोर्टलच्या माध्यमातून विक्री केली जाते. लक्झरी उत्पादनांची बाजारपेठ २५०० कोटी रुपयांची असून ओपलचा व्यवसाय सरासरी ४० टक्के दराने वाढतो आहे असेही त्यांनी सांगितले
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.