आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oppo Is About To Launch New Smartphone N1 Mini In India With Rotating Camera

24 MP रोटेटींग कॅमेर्‍या सोबत Oppo N1 mini स्मार्टफोन भारतात; आठवड्याभरात लॉन्च होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Oppo N1 mini
गॅझेट डेस्क - Xiaomi ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा चीनी स्मार्टफोन कंपनी भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी भारतात 13 MP रोटेटींग कॅमेर्‍याचा स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता ओप्पो कंपनी आपल्या बहूचर्चीत N1 मिनी या स्मार्टफोनला भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या फोटोवर "Coming Soon" टॅगलावून हा फोटो आपल्या भारताच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ट्वीटर अकाऊंटमध्ये कंपनीने हा फोन एका आठवड्यात भारतात लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे. N1 मिनीमध्ये असलेल्या 24 मेगापिक्सल कॅमेर्‍यामुळे यातून मिळणारे फोटो उच्चदर्जाचे असतील.
मुळात या फोनमध्ये केवळ 13 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आहे, मात्र या फोनमधील खास अशा अल्ट्रा HD फीचरला सुरू केल्यानंतर हा ओप्पो फोन 24 मेगापिक्सल एवढ्या क्षमतेचा फोटो काढू शकतो. काही वेळापूर्वी ओप्पोने आपल्या फाईंड 7 फोन भारतात लॉन्च केला होता. या फोनमध्येही अशाच प्रकारचे फोटो क्षमता वाढवण्याच्या सॉफ्टवेअर ट्रीकचा वापर करण्यात आला होता. फाईंड 7 मध्येही 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा सॉफ्टवेअरच्या मदतीने 50 मेगापिक्सल कॅमेर्‍याच्या क्षमतेचे फोटो (कंपनीच्या माहितीनुसार) काढता येतात. ओप्पो कंपनी आपल्या स्मार्टफोन्सच्या कॅमेरा क्षमतेसाठीच जास्त लोकप्रिय आहे.
रोटेटिंग कॅमेरा -
ओप्पो N1 मिनीमध्येही रोटेटींग कॅमेरा देण्यात आला आहे यामुळए फ्रन्ट आणि बॅक अशा दोन्ही बाजूचे फोटो काढता येतात. विशेष म्हणजे यामुळे दोन्ही बाजूस एकाच क्षमतेचा कॅमेरा मिळतो, सेल्फी शौकीनांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या या फोनचे फीचर-