आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

REVIEW: चायना आयफोन \'ओप्पो R1\' भारतीय बाजारात; जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी किंमत आणि आकर्षक फीचर्समुळे चायना स्मार्टफोन सध्या भारतीय बाजारात लोकप्रिय ठरले आहेत. भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन मेकर चायना कंपन्यांनी पाय पसरवले आहेत. चायना स्मार्टफोन मेकर कंपनी 'ओप्पो' ने आपले दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवले आहेत. प्रीमियम फोन 'रोटेटिंग कॅमेरा N1' आणि 'R1' हे दोन्ही फोन अल्पावधीत लोकप्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओप्पो R1 चा लूक हुबेहूब आयफोनसारखा आहे.

'ओप्पो R1'ला चायनीज आयफोन म्हणूनच संबोधले जाते या फोन अनेक अद्ययावत फीचर्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे युजर्सला हा फोन हाताळताना अगदी आयफोनचा फिल येतो.

divyamarathi.com आपल्या स्पेसिफिकेशन रिव्ह्युच्या माध्यमातून 'ओप्पो R1'मधील वैशिष्ट्ये नमूद केले आहे.

* ओप्पो R1 चे डिझाइन...
'ओप्पो R1' हा स्मार्टफोन 'आयफोन 4' सारखा दिसतो. विशेष म्हणजे या फोनची डिझाइन आयफोन पेक्षा थोडी वेगळी आहे. मात्र, याचा टच आणि डिझाइन बहुतांश यूजर्सला अॅपल सारखा वाटतो. या फोनच्या फ्रंटला ग्लास स्क्रीन आहे. तसेच हा ग्लास रिफ्लेक्टिव्ह आहे. ग्लास कव्हर फोन युजर्सचे लक्ष चटकण वेधून घेतो. मात्र, युजर्सला एक समस्या उद्‍भवू शकते आणि ती म्हणजे हा फोन हातातून सटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'ओप्पो R1'सोबत एक प्लास्टिक कव्हर देखील दिले जाते. परंतु त्यामुळे फोनचे अॅट्रॅक्टिव्ह पार्ट्स झाकले जातात.

हाय-ग्लॉस सर्फेस असल्याने यूजर्सचे हाताचे फिंगर प्रिंट्स स्क्रीनवर उमटतात. फ्रंट साइडला कोणतेही बटन दिलेले नाही. स्क्रीनच्या खाली कॅपेसिटिव्ह आयकॉन दिला असून स्क्रीन ऑन झाल्यानंतर तो दिसतो.

फोनच्या डाव्याबाजुला व्हॉल्युम रॉकर बटन आणि पॉवर बटन दिले आहे. या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'ओप्पो R1'मधील अन्य फीचर्स...
(फोटो: Oppo R1)