आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी गुंतवणूक मर्यादांत सुसूत्रता; वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फुगलेली चालू खात्यातील तूट कमी करण्याच्या दृष्टीने देशात जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याची सरकारची योजना आहे. त्याचेच एक पाऊल म्हणजे सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट रोखे बाजारपेठेसाठी असलेली विदेशी गुंतवणूक मर्यादांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी जाहीर केले. विद्यमान सर्व उपमर्यादा एक एप्रिलपासून दोन मोठ्या विस्तारलेल्या गटात विलीन करण्यात येणार असल्याचेदेखील ते या वेळी म्हणाले.


मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची योजना आगाऊ करता यावी या दृष्टीने कॉर्पोरेट रोख्यांचा 80 टक्के वापर झाल्यानंतर सरकार विदेशी गुंतवणूक मर्यादेचा आढावा घेण्यात येईल, असे स्पष्ट करून चिदंबरम पुढे म्हणाले की, सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक मर्यादा ही विदेशी गुंतवणूकदारांची मागणी आणि वापर आणि आर्थिक गरजांवर अवलंबून असेल, असे चिदंबरम यांनी सांगितले. संपादकांच्या राष्टीय परिषदेत ते बोलत होते.
दोन विस्तारलेल्या गटांपैकी पहिला गट जुने आणि दीर्घ मुदतीचे सरकारी रोखे एकाच मोठ्या सरकारी रोख्यांमध्ये समाविष्ट करण्यात येईल. त्याची एकूण मर्यादा 25 अब्ज डॉलर असेल. दुस-या गटात सर्व कंपनी रोखे समाविष्ट करण्यात येऊन त्याची एकूण मर्यादा 51 अब्ज डॉलर असेल.

अर्थव्यवस्थेला वृद्धीच्या शिखरावर नेणार - अर्थव्यवस्थेला पुन्हा सर्वाधिक वृद्धीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार नव्या पिढीला सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने स्थिर प्रयत्न सुरू असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना चिदंबरम पुढे म्हणाले की, विदेशी थेट गुंतवणुकीच्या नियमांचे उदारीकरण आणि अन्य उपाययोजनांच्या मदतीने वित्तीय सर्वसमावेशकता आणि सुधारणांचे बरेचसे अंतर सरकारने पूर्ण केले आहे.

युरोझोनचा फटका भारतालाही बसणार- युरोझोनमधील आर्थिक पेचप्रसंगामुळे जगभरातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम झाला असून भविष्यात त्याचा फटका भारतालही बसण्याची भीती व्यक्त करतानाच चिदंबरम म्हणाले युरोझोनच्या पेचप्रसंगामुळे जागतिक स्थिरतेची जोखीम निर्माण झाली असून त्यावर सध्यातरी कोणताही निश्चित उपाय सापडलेला नाही. याचा परिणाम म्हणून देशाच्या निर्यातीतही झपाट्याने घट झाल्याची चिंता चिदंबरम यांनी व्यक्त केली.