आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P.Chidambaram News In Marathi, Divya Marathi, Lok Sabha Election

आचारसंहितेचा बँक परवान्यावर परिणाम नाही, पी. चिदंबरम यांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झालेली असली तरी त्याचा नवीन बँक परवान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही बँक परवाने देण्याची शक्यता असल्याचे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नवीन बँक परवाना प्रक्रियेशी आचारसंहितेचा संबंध कसा येऊ शकतो. सरकार आणि नियंत्रक त्यांच्या जबाबदा-या पार पडत असून काही परवाने देण्याची त्यांची मनीषा असल्याचे चिदंबरम यांनी दिल्लीमध्ये राष्‍ट्रीयीकृत बँक पदाधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.

आतापर्यंत अशा प्रकारचे संकेत मिळालेले असून बँक परवाना प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येणार नाही आणि तो रिझर्व्ह बँकेचा निर्णय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिमल जालान समितीने नवीन बँक परवान्यांच्या अर्जांची छाननी करून त्याचा अहवाल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेकडे सुपूर्द केला. या छाननी अर्जांतून रिझर्व्ह बँक अंतिम निवड करणार आहे.
बँकिंग क्षेत्राच्या कन्सोलिडेशनसाठी आपण अनुकूल असलो तरी त्यासाठी सर्वप्रथम बँकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बँकांनी आपल्या भागधारकांनादेखील विश्वासात घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून चिदंबरम यांनी स्रोतांची उभारणी करण्यासाठी सरकारकडून राष्‍ट्रीयीकृत बँकांना जास्तीत जास्त निधी पुरवला जाईल, असेही सांगितले.

रिझर्व्ह बँकेकडे अधिकार