आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Chidambaram's Rebuke To Bank Employee News In Marathi, Divyamarathi

बँकेचा सर्व नफा वेतनावर खर्च नको; चिदंबरम यांनी कर्मचार्‍यांना फटकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बँकांना होणारा सर्व नफा कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी वापरता येत नाही. बँकांना इतरही जबाबदार्‍या असतात, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संपकरी बँक कर्मचार्‍यांना सोमवारी फटकारले. वेतनात वाढ करावी या मागणीसाठी देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी संपावर आहेत.

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या 78 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चिदंबरम म्हणाले, बँकेच्या नफ्यात अनेक वाटेकरी असतात याची कल्पना सर्व बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आहे. यापूर्वी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा विचार करण्यात आला असून त्याप्रमाणे योग्य वेतन देण्यात येत आहे. मात्र, बँकेच्या नफ्यातील सर्व वाटा वेतनासाठी देता येत नाही. बँकेच्या भांडवलातही भर टाकणे आवश्यक असते, अन्यथा पुढील पाच, 10 किंवा 20 वर्षांत भांडवल गरजापूर्तीसाठी बँकेच्या तिजोरीत खडखडाट होईल.

वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि काही खासगी बँकांचे कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. संपामुळे सर्व सरकारी बँकांतील कामकाज ठप्प झाले.