आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P N Gadil Group Provide Sportsman Favorite Food To Customer

गाडगीळांची हॉटेल भरारी; क्रीडापटूंच्‍या आवडीचे पदार्थ देणार ग्राहकांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सचिन तेंडुलकरसारख्या क्रीडा क्षेत्रातील गाजलेल्या खेळाडूना आवडणारे पदार्थ देणारी स्पोर्टस लाऊंज संकल्पना असलेल्या इन्फिनिटी हॉटेलची साखळी लवकरच पुण्यासह औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापुरात उभारली जाणार आहेत. अशी माहिती गाडगीळ हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली.

पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या पोस्ट नाईनटीवन हॉटेलला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल त्या ठिकाणी गोल्डमाईन ही नवी संकल्पना असलेले मल्टी क्विझीन हॉटेल सुरु झाले. त्‍याप्रसंगी माहिती देताना ते म्हणाले, की गेली काही वर्षे मंदी असूनही एका आर्थिक वर्षात 60 हजार ग्राहक आम्हाला मिळाले. यावरून मागणी कशी आहे हे लक्षात येते. स्पोर्टस लावुन्ज कल्पना बाणेरमध्ये प्रथम राबविली जाणार आहे. सुमारे दहा हजार चौरस फूट जागेत हे स्पोर्टस लावुन्ज असेल आणि तिथे प्रसिध्द खेळाडूंची वॉल ऑफ फेम उभारली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील आणि जगातील अशा मिळून दहा ते बारा खेळाडूंना आवडत असलेले पदार्थ येथे उपलब्ध केले जातील. याला कसा प्रतिसाद मिळतो तो पाहून संख्या वाढविली जाईल.

पुण्यात विस्तार करणे महाग असून त्यापेक्षा महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूरसारख्या शहरात फ्रँचायजी तत्वावर साखळी हॉटेल सुरु करण्यावर कंपनीचा भर राहील. तसेच कोकणातील वाढते पर्यटन पाहता दापोलीजवळ कर्दे आणि लाट्घर दरम्यान 40 एकर जागेत रिसोर्ट उभारले जाणार असून ते 2018 पर्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. रिअल इस्टेट, दागिने, हॉटेल आणि चित्रपट निर्मिती या चार क्षेत्रात विस्तार केलेला हा समूह आहे.

विलेपार्ले येथे पु. ना गाडगीळ आणि कंपनीची सराफी दुकानाची नवी शाखा येत्या तीन ऑगस्‍टला सुरु होणार असून तिचे उदघाटन प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या हस्ते होणार आहे असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले. सध्या सोन्याच्या आयातीवर सरकारने घातलेले निर्बंध आणि आगामी सणासुदीचा काल पाहता दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव पुन्हा प्रती दहा ग्रॅम 30 हजार रुपयांचा टप्पा गाठतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.