आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी-नोट्सधारक येणार कराच्या जाळ्यात : शोम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून देण्यात आलेल्या पार्टिसिपेटरी नोट्सवर (पी-नोट्स) सध्या कोणत्याही प्रकारे कर आकारला जात नाही, परंतु आगामी अर्थसंकल्पात पार्टिसिपेटरी नोट्सधारकांना नव्या कराचा भार सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत वित्त मंत्रालय अनुकूल असल्याचे वित्त मंत्रालयाचे सल्लागार पार्थसारथी शोम यांनी सांगितले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून विदेशी गुंतवणूकदारांना अदा करण्यात येणार्‍या पार्टिसिपेटरी नोट्सवर प्राप्तिकर खात्याकडून सध्या कोणताही कर आकारला जात नाही, परंतु वित्त विभागाशी चर्चा झाल्यानंतर कदाचित पुढील अर्थसंकल्पात पार्टिसिपेटरी नोट्सधारकांना कराच्या जाळ्यात आणले जाऊ शकते, असे शोम यांनी आयसीएआयच्या एका कार्यक्रमात सांगितले.