आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी-नोट्स गुंतवणुकीचे प्रमाण घटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशातील अतिश्रीमंत व्यक्ती आणि हेज फंडांसाठी पार्टिसिपेटरी नोट्सच्या माध्यमातून मुंबई विदेशातील निधी भांडवल बाजारात गुंतवण्यासाठी सर्वात पसंतीचा मार्ग असतो. परंतु या माध्यमातून समभागांमध्ये होणारी गुंतवणूक घसरली आहे. डिसेंबर महिन्यात पार्टिसिपेटरी नोट्सद्वारे (पी-नोट्स) होणारी गुंतवणूक 1.67 लाख कोटी रुपये अशा तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.
भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भांडवल बाजारातील समभाग, कर्ज आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये होणारी एकूण पार्टिसिपेटरी नोट्स गुंतवणूक अगोदरच्या वर्षातल्या 1.83 लाख कोटी रुपयांवरून नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यात ती 1,67,566 कोटी रुपयांवर आली आहे.
अशा प्रकारच्या गुंतवणुकीचे संकलित मूल्य 1.71 लाख कोटी रुपये असल्याने डिसेंबरमधील गुंतवणुकीचे प्रमाण सर्वात कमी आहे. डेरिव्हेटिव्हजमधील पी-नोट्स गुंतवणुकीचे प्रमाणदेखील 31 डिसेंबरअखेर 1.15 लाख कोटी नोंद झाले आहे. पी-नोट्सच्या माध्यमातून होणा-या विदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे एकूण प्रमाणदेखील डिसेंबरमध्ये 11.4 टक्क्यांवर आले आहे.
पी-नोट्स म्हणजे काय ?
विदेशातील अतिश्रीमंत व्यक्ती, हेज फंड आणि अन्य विदेशी संस्था प्रामुख्याने पी- नोट्सचा वापर करतात. नोंदणीकृत विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या माध्यमातून भारतीय समभाग बाजारपेठेत गुंतवणूक करण्याची त्यांना परवानगी असते. त्यामुळे थेट नोंदणीशी निगडित खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते.