निवडणूक निकालांवर ठरणार / निवडणूक निकालांवर ठरणार सुधारणांची दिशा

वृत्तसंस्था

Mar 28,2014 03:00:00 AM IST

नवी दिल्ली - देशातील आर्थिक सुधारणांना निवडणूक निकालानंतरच दिशा मिळण्याची शक्यता जागतिक पातळीवरील ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने व्यक्त केली. लोकसभा निवडणुकांनंतर देशात स्थिर सरकार येण्याची शक्यता असल्याने मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटले आहे. स्थिर सरकार आर्थिक सुधारणांना अधिक गती देईल असेही अहवालात नमूद आहे.

मॉर्गन स्टॅनलेने नुकताच फाइव्ह की रिफॉर्म्स टू फिक्स इंडिया ग्रोथ प्रॉब्लेम नावाचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, स्थिर सरकारमुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल आणि आगामी काळात चांगली आर्थिक वाढ दिसून येईल.भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा 7 ते 8 टक्के विकास दरावर आणण्यासाठी या अहवालात पाच प्रमुख सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात महसुली तूट कमी करणे, धोरणात बदल, एकूण कारभारात सुधारणा, शहरीकरण धोरणाचा फेरविचार आणि ऊर्जा तसेच खाण क्षेत्रात कडक नियमांत शिथिलता यांचा समावेश आहे. सध्याची मरगळ दूर करण्यासाठी आणि विकास दर पुन्हा 8 टक्क्यांवर आणण्यासाठी नव्या सरकारला या सुधारणा करणे आवश्यक आहे.

X
COMMENT