आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरच्या प्रारंभी करा शैक्षणिक कर्जाची फेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निशाने ब्रिटिश युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तिला नोकरीही मिळाली आहे. तिला 40 हजार रुपये महिना पगार आहे. निशाने शिक्षणासाठी बँकेकडून 10 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन ) घेतले होते. त्याच्या परतफेडीचा स्थगन अवधी (मॉरटॉरिअम पीरियड) उलटून गेल्यानंतरचा मासिक हप्ता (ईएमआय) 29, 396 रुपये आला. दैनंदिन खर्च आणि बचतीसाठी तिच्याकडे अत्यंत कमी रक्कम उरते. मात्र, अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना निशाप्रमाणे नोकरी मिळेलच असे नाही, ज्यातून एवढा ईएमआय फेडू शकतील. करिअरच्या प्रारंभीच्या काळात शैक्षणिक कर्जाची परतफेड कशी करावी याबाबत माहिती अशी..


अर्जापूर्वी मूल्यांकन करा : जो अभ्यासक्रम करायचा आहे, त्यासंदर्भातील सर्व बाबींविषयी जाणून घ्या, त्याची माहिती घ्या. जसे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत तो अभ्यासक्रम पूर्ण करणे कितपत योग्य आहे? त्या क्षेत्रात देश-विदेशात नोकरीच्या संधी आहेत का ?आगामी काळात तसेच दीर्घकालीन किती संधी त्या क्षेत्रात आहेत ?
गरजेपुरतेच घ्या शैक्षणिक कर्ज : आपण मोठ्या रकमेच्या शैक्षणिक कर्जासाठी पात्र असाल. तसेच सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याइतपत शुल्काबरोबर कर्ज मिळत असले तरी मोहात न पडता आवश्यक तेवढ्या रकमेचे कर्ज घ्या. काही रकमेची पूर्तता मित्र, नातेवाइकांकडून उसनवारीने करू शकता.


बँकेशी नाते : सर्वात कमी दरात कोठे कर्ज मिळते याची माहिती घ्या किंवा पालक ज्या बँकेशी दीर्घकाळ व्यवहार करत आहेत, अशा बँकेकडून तुम्हाला कमी व्याजदराचे कर्ज मिळू शकते.स्टेप अप रिपेमेंट सुविधा : ज्या बँकेत स्टेप अप रिपेमेंट सुविधा आहे, अशा बँकेकडूनच कर्ज घ्या. प्रारंभीच्या काळात कमी ईएमआय आणि भविष्यात उत्पन्न वाढल्यानंतर जास्त ईएमआय अशी सोय त्यामुळे मिळते. अलीकडेच 7.5 लाख रुपयांच्या रकमेचे कर्ज चुकवण्यासाठी 10 वर्षे मुदतीऐवजी आता जास्तीत जास्त 15 वर्षे मुदत झाली आहे.


खर्चावर नियंत्रण ठेवा, बचत करत राहा : नवी नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याकडून जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी ईएमआयकडे लक्षात द्यावे. आपल्या बँकेच्या खात्यातून ईएमआयची कपात होण्यासाठी थेट ऑटो डेबिट सुविधा करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे हप्ता चुकणार नाही. त्याबरोबरच बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. टर्म विमा, व्यक्तिगत अपघात विमा खरेदी करा. सर्वोत्तम रेटिंग असलेल्या म्युच्युअल फंडात किंवा पीपीएफमध्ये गुंतवणूक करा.


लोन प्री-पेचा प्रयत्न करा : दरवर्षी किंवा दुसºया वर्षापासून कर्जातील काही रक्कम परतफेड करण्याचा प्रयत्न करा व त्यातून बचत साधा. प्री-पेमेंटसाठीच्या अटी व नियम माहिती करून घ्या. बहुतेक बँका प्रीपेमेंट करण्यासाठी शुल्क आकारणी करत नाहीत.


हप्ता चुकवू नका : ईएमआय वेळोवेळी भरा. चार लाखांपेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी मालमत्ता तारण ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, थकबाकीदार व्हा. असे झाल्यास आपली पत धोक्यात येऊ शकते. कर्जाची परतफेड करणे हे भयावह काम आहे हा समज काढून टाका. ईएमआय वेळेत जाण्यासाठी नियोजन करण्याची गरज असते, ते करा.


लेखक bankbazaar.com सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com