आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पजेरो स्पोर्ट्समध्ये आता नव्या सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मित्सुबिशी पजेरो स्पोटर्सच्या स्पोटर्स युटिलिटी व्हेइकलच्या (एस.यू.व्ही.) वर्षपूर्तीनिमित्त पजेरो गाडीत नवीन अत्याधुनिक सुविधांची वाढ करण्यात आली आहे. नव्या सुविधांत टच स्क्रीन ऑडिओ सिस्टिम, जी.पी.नेव्हिगेशन, रिअर व्ह्यू कॅमेरा, स्पोर्टी रिअर स्पॉयलर बॉडी कलर, बम्पर व एम्बेलेमसहित मडगार्डचा समावेश करण्यात आल्याची माहिती मित्सुबिशीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पी.विजयन यांनी दिली.
या वेळी मित्सुबिशीचे नॅशनल सेल हेड आशिष कौल, सेल्स हेड स्वामीन घोष व पेटकर मोटर्सचे मालक सचिन पेटकर उपस्थित होते. विजयन म्हणाले, जपान टेक्नॉलॉजीवर आधारित हिंदुस्तान मोटर्स लिमिटेडचा चेन्नईजवळील थिरुवल्लूर येथे पजेरो स्पोटर्सचा उत्पादन कारखाना आहे.
सदर गाडी खडतर मार्गासाठी उपयोगी असून दर्जेदार उत्तम प्रतीची अंतर्गत रचना गाडीत करण्यात आली आहे. या गाडीची शहरातील किंमत 30 लाख असून मागील वर्षभरात देशात दोन हजार गाड्यांची विक्री करण्यात आली आहे.


पजेरो स्पोटर्सचे फीचर्स

उत्तम दर्जाचे इंटेरिअर
राइज बॉडी, सुपर सिलेक्ट 4 डब्ल्यूडी
2.5 लि. हाय पॉवर डिझेल इंजिन
5.6 मी.टर्निंग रेडियस