आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Palm Oil Imports By India Drop As Weakening Rupee Cuts Demand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाद्यतेल शुल्कवाढीला अडचणीची फोडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिफाइंड खाद्यतेलावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाने मांडला आहे. मात्र, कृषी मंत्रालयाने मांडलेल्या प्रस्तावास ग्राहक मंत्रालयाकडून विरोध असल्याची माहिती ग्राहक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या मते, देशात आवश्यक खाद्यतेलांपैकी सुमारे 50 टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. या परिस्थितीत जर रिफाइंड खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली तर स्थानिक बाजारातील तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. सध्या रिफाइंड खाद्यतेलावरील आयातीवर 7.5 टक्के, तर क्रूड पामतेलाच्या आयातीवर 2.5 टक्के शुल्क आकारण्यात येते. रिफाइंड खाद्यतेल आणि क्रूड पामतेलाच्या आयात शुल्कात पाच टक्क्यांचा फरक असल्यामुळे रिफाइंड खाद्यतेलाची अधिक प्रमाणात आयात केली जात आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगावर परिणाम होत असल्याचे उद्योग व्यवस्थापनाचे मत आहे. रिफाइंड तेलावरील आयात शुल्क 10 टक्के केले तर क्रूड पामतेलाची जास्त प्रमाणात आयात होईल आणि स्थानिक रिफायनरी उद्योगाला याचा लाभ होईल. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मतानुसार खाद्यतेलाची आयात जूनमध्ये 9.11 लाख टनांवर पोहोचली होती. यामध्ये 2.96 लाख टन रिफाइंड तेल, तर 6.14 लाख टन क्रूड पामतेलाचा समावेश होता. चालू वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत करण्यात आलेल्या तेलाच्या एकूण आयातीत रिफाइंड तेलाचा 22 टक्के वाटा आहे.