आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅनासॉनिकचे 26 एसी दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ग्राहकांना कूल कूल करण्यासाठी पॅनासॉनिक इंडियाने यंदाच्या उन्हाळ्यात थेट 26 एअर कंडिशनर्स बाजारात दाखल केले आहेत. इतकेच नाही तर आर्थिक वर्ष 2013 मध्ये स्प्लिट एअर कंडिशन उपकरणांमधील 20 टक्के बाजारहिस्सा कमावण्याबरोबरच 120 कोटी रुपयांची गुंतवणूक योजनादेखील कंपनीने आखली आहे.
ऊर्जा बचत संकल्पना घेऊन पॅनासॉनिक आपल्या ‘इकोनावी’ या वातानुकूलित उपकरणांचा विस्तारही करीत आहे. त्यानुसार या मालिकेत सात विभाग आणि 19 मॉडेल असा विस्तार झाला आहे. या श्रेणीतील वातानुकूल यंत्रामध्ये अनोखे इन्व्हर्टर तंत्रज्ञान वापरण्यात आले असून त्यामुळे हे यंत्र हवे असलेले तापमान जलद साध्य करते तसेच इतर वातानुकूलित यंत्रांच्या तुलनेत जास्त काम करते, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये ‘टेम्परेचर वेव्ह’ तंत्रज्ञानामुळे 38 टक्के ऊर्जेची बचत होते. या वातानुकूल उपकरणांची किंमत 21,990 ते 78,490 रुपयांच्या दरम्यान आहे. वातानुकूल यंत्रांच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत भक्कम पाय रोवण्यासाठी कंपनीने सध्या गाजत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला घेऊन खास जाहिरातदेखील तयार केली आहे.