आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pancard Nessesary For Purching The Gold: Reserve Bank's Committee's Recomandation

सोने खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक : रिझर्व्ह बॅँकेच्या समितीची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोन्याच्या वाढत्या मागणीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत आहे. आता त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे उच्च मूल्याच्या सोने खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक करणे, सोने कर्जावर मर्यादा आणि सुवर्ण कर्जाचे व्यवहार करणा-या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या शाखांवर देखरेख ठेवणे आदी काही शिफारशी रिझर्व्ह बॅँकेच्या समितीने केल्या आहेत. ठरावीक मर्यादेच्या पलीकडे सोन्याच्या खरेदीसाठी धनादेशाद्वारे रक्कम अदा करणे, सोन्यातील प्रत्यक्ष गुंतवणुकीला लगाम घालण्यासाठी अन्य काही बचत उत्पादने बाजारात आणणे, सोने खरेदीसाठी बॅँकांकडून वित्त साहाय्य देण्यावर बंदी तसेच गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बुलियन कॉर्पोरेशन सुरू करण्याच्या प्रस्तावाला चालना देणे यादेखील काही शिफारशी या समितीने केलेल्या आहेत.

केवायसी सक्षम करा
‘केवायसी’ यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व प्रकारच्या कर्ज प्रस्तावांसाठी कर्जदाराकडून पॅन कार्डाची प्रत मागवावी, असेही या समितीने सुचवले आहे. सध्या पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अलंकार खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. मालमत्ता, कर्जाऊ रक्कम, सुवर्ण कर्ज देणा-या वित्तीय कंपन्यांत होणा-या वाढीवर लक्ष ठेवण्याची गरज समितीने अधोरखित केली.

गोल्ड बँक स्थापन करा
देशात जवळपास 20 हजार टन सोने नुसते पडून आहे. त्यामुळे या सुवर्ण साठ्याचा योग्य वापर करण्यासाठी ‘गोल्ड बँक’ स्थापन करावी आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) माध्यमातून या गंगाजळीचा उत्पादक वापर व्हावा, असे सुचवतानाच या समितीने बँकांप्रमाणे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना सुवर्ण कर्ज देणा-या एनबीएफसी म्हणून दर्जा देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोल्ड बँक स्थापन झाल्यास आयात, निर्यात, व्यापार, कर्ज , सोन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहार करण्यासाठी या बँकेला अधिकार मिळू शकतील, असे अहवालात म्हटले आहे.