आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारले 20 वर्षांनंतर शीतपेय बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- थम्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट आणि सिट्रा बाजारात आणल्यानंतर आता पारले अँग्रो कंपनी 20 वर्षांनंतर पुन्हा शीतपेय बाजारपेठेत सक्रिय झाली आहे. कंपनी आता ‘कॉफी रश- कॅफे क्युबा’ या उत्पादनाने शीतपेयप्रेमींना ताजेतवाने करणार आहे.

कंपनीची सध्याची उलाढाल दोन हजार कोटी रुपये आहे. परंतु आता कॉबरेनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स गटातील पुनप्र्रवेश आणि कॅफे क्युबा या नव्या उत्पादनाच्या माध्यमातून ही उलाढाल पाच हजार कोटी रुपयांवर नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर वितरण जाळे बळकट करताना सध्याच्या आठ लाखांच्या तुलनेत वितरण केंद्रांची संख्या 15 लाखांपर्यंत नेण्यात येणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष प्रकाश चौहान यांनी सांगितले.

काय आहे कॅफे क्युबा
भाजलेल्या कॉफी बियांचा स्वाद आणि कॉबरेनेटेड फीज यांचे अनोखे मिर्शण या पेयामध्ये आहे. शीतपेयप्रेमींसाठी ‘फ्लेवर्ड ड्रिंक्स’चा एक नवा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. सध्या हे पेय 20 रुपये किंमत असणार्‍या 250 मि.लि.च्या कॅनमध्ये उपलब्ध आहे.