आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pass The Finance Bills, Reserve Bank Appeal To Political Parties

आर्थिक विधेयके मंजूर करा,रिझर्व्ह बँकेची राजकीय पक्षांना विनंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आर्थिक विधेयकांना मंजुरी मिळवून देणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी प्रमुख आर्थिक विधेयकांची मंजुरी लांबणीवर टाकू नये, अशी विनंती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात स्थिर सरकारच येणार असे मानून चालणार नाही. त्यामुळे प्रमुख विधेयकांना मंजुरी देण्याचे काम निवडणुका झाल्यानंतर करता येईल असे म्हणून या मान्यता स्थगित करणे धोक्याचे ठरू शकते. कारण निवडणुका झाल्यानंतर राजकीय परिस्थिती आणखी आव्हानात्मक होऊ शकते, याकडेही राजन यांनी लक्ष वेधले. दिल्लीत आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत ते बोलत होते.रखडलेले प्रकल्प रुळावर आणण्यासाठीचा विलंब किंवा वित्तीय तुटीत अतिरिक्त झालेली वाढदेखील नव्या सरकारची आव्हाने आणखी वाढवू शकतात, असेही राजन म्हणाले.