आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखर उत्पादन शुल्कवाढीस पवारांचा होकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - साखरेवरील उत्पादन शुल्कात किलोमागे दीड रुपयांनी वाढ करण्याच्या अन्न मंत्रालयाच्या प्रस्तावाला हरकत नसल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सांनी सोमवारी व्यक्त केले. साखरेवरील नियंत्रण हटवल्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणालीत अनुदानीत दरात साखर विक्री सुरूच राहणार आहे. सरकारवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी साखरेवरील उत्पादन शुल्क वाढीचा प्रस्ताव अन्न मंत्रालयाने तयार केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सधअया साखरेवर किलोमागे 95 पैसे उत्पादन शुल्क आहे. ते वाढवून दीड रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.