आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च्पदस्थ अधिकार्‍यांच्या पे-स्लीपचे स्कॅनिंग होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोठय़ा कार्पोरेट कंपन्या आणि सार्वजनिक उद्योगातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या पे-स्लीप स्कॅनिंग करण्याचा निर्णय प्राप्तिकर खात्याने घेतला आहे. उच्चपदस्थांना मिळणारे विविध भत्ते तसेच भरपाईपोटी मिळणारी रक्कम यात कर कपातीच्या संधी आहेत का हे प्राप्तिकर खाते याद्वारे जाणून घेणार आहे. प्राप्तिकर खाते आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पगारीतील उगमस्थानी कर कपातीवर (टीडीएस) लक्ष केंद्रित करण्याचे ठरले.

टीडीएसमधून जास्त कर मिळण्याच्या संधी असल्याचे मत प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षीच्या एकूण करसंकलनात टीडीएसद्वारे मिळालेल्या कराचे प्रमाण 41 टक्के होते. त्यामुळे बड्या कंपन्या, सार्वजनिक उद्योग आणि जास्त कर्मचारी असणार्‍या कंपन्यांतील उच्चपदस्थांच्या एकूण पगार रचनेवर लक्ष केंद्रित करण्याचे प्राप्तिकर खात्याने ठरवले आहे. एवढेच नव्हे, तर विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधून गेस्ट लेक्चर म्हणून देण्यात येणार्‍या रकमांवरही प्राप्तिकर खाते नजर ठेवणार आहे. इव्हेंट मॅनेजर आणि मेडिकल ट्रान्सक्रिप्शन कंपन्यांना देण्यात येणार्‍या रकमाही टीडीएसच्या नियमात येणार असल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.