Home | Business | Gadget | pay tax through mobile, business, gadgets

मोबाइलद्वारेही भरता येणार आता आयकर

वृत्तसंस्था | Update - Jun 25, 2011, 05:07 AM IST

मोबाइलद्वारे आयकर रिटर्न दाखल करता येण्यासाठी आज ‘टॅक्सस्पॅन’ या आॅनलाइन आयकर रिटर्न कंपनीकडून विकसित सॉफ्टवेअरची मोबाइल आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

  • pay tax through mobile, business, gadgets

    नवी दिल्ली- मोबाइलद्वारे आयकर रिटर्न दाखल करता येण्यासाठी आज ‘टॅक्सस्पॅन’ या आॅनलाइन आयकर रिटर्न कंपनीकडून विकसित सॉफ्टवेअरची मोबाइल आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
    कंपनीने सुरू केलेल्या नवीन मोबाइल संकेतस्थळामुळे ग्राहकांना मोबाइल वापरून सहज आयटी रिटर्न दाखल करता येईल, अशी माहिती कंपनीचे सीईओ अंकुर शर्मा यांनी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ग्राहकांना ही सुविधा वापरता येणार आहे. ग्राहकाला यासाठी नोंदणी करण्याची गरज नसून, फक्त व्यक्तिगत तपशिलासह प्रपत्र भरून तिथेच प्रपत्र १६ दाखल करावे लागेल. त्यानंतर स्वयंचलितपणे आयटीआर तयार होईल, व पुढे विकसीत सॉफअटवेअरमुळे ती ग्राहकांना मिळेल अशी माहितीही कंपनीने दिली आहे.

Trending