आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शनधारकांना वैद्यकीय सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) 30 लाखांहून जास्त निवृत्तिवेतनधारकांना आगामी काळात वैद्यकीय सुविधा मिळण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय उपचारांसाठी अशा सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे ईपीएफओला वाटते. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांना वैद्यकीय सुविधा देण्याबाबत विचार सुरू असल्याचे ईपीएफओने म्हटले आहे. वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी येणार्‍या खर्चाची पूर्तता करणार्‍या पर्यायांबाबत अभ्यास सुरू आहे. या सुविधेसाठी निवृत्तिवेतनातून काही रक्कम द्यावी लागेल की ही सुविधा पूर्णपणे मोफत असेल, हे सर्व सरकारच्या भूमिकेवर अवलंबून राहील, असे ईपीएफओच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

अधिकार्‍याच्या मते, निवृत्तिवेतनधारकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (ईडीएलआय) या फंडातील उपलब्ध रकमेचा वापर केला जाऊ शकतो. सदस्यांकडून येणार्‍या मागणीच्या आधारावर सदस्यांसाठी नवी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्नही याचाच एक भाग आहे. निवृत्तिवेतनधारकांना ही सुविधा देण्यासाठी वेळ लागू शकतो. केंद्राने यापूर्वीच ईपीएफओच्या निवृत्तीधारकांना किमान 1000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय र्शम मंत्रालयाने या संदर्भात कॅबिनेट नोट पाठवली आहे. आगामी बैठकीत मंत्रिमंडळाची या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या सदस्यांना किमान पेन्शन 1000 रुपये करणे आणि मूळ वेतन र्मयादा वाढवून 15,000 करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

आता 20 टक्के जास्त डेथ बेनिफिट
संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना आता 20 टक्के जास्त डेथ बेनिफिट मिळणार आहे. ईपीएफओच्या एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (ईडीएलआय) या योजनेअंतर्गत मिळणार्‍या डेथ बेनिफिटमध्ये आता 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत ईडीएलआय योजनेतून 1,30,000 रुपयांचे डेथ बेनिफिट दिले आहे. ईपीएफओच्या सूत्रांनुसार ईडीएलआय योजनेचे मूल्यमापन (अँक्युरियल व्हॅल्यूएशन) सुरू आहे. त्यातून या फंडाची वास्तविक स्थिती समजणार आहे.

आणखी फायदा
0 ईपीएफओच्या सदस्यांची मूळ वेतन र्मयादा 6500 रुपयांवरून वाढून 15,000 रुपये करण्याचा प्रस्ताव विधी मंत्रालयाकडे पाठवला.
0 मूळ वेतन र्मयादा वाढवल्याने ईपीएफओच्या सदस्य संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे.

मोफत सुविधा
या सुविधेसाठी निवृत्तिवेतनातून काही रक्कम द्यावी लागेल की ही सुविधा पूर्णपणे मोफत असेल, हे सर्व सरकारच्या भूमिकेवर अवलंबून राहील.