आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People May Get Some Tax Relief In Upcoming Budget

बजेट 2013: गृहकर्जावर जास्‍त सवलत मिळण्‍याची शक्‍यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना येणा-या काळात महागाईचे चटके बसणार आहेत. वाढलेल्‍या महागाईच्‍या दराने तसे संकेत दिले आहेत. जानेवारीमध्‍ये महागाईचा दर 10.79 टक्‍क्‍यांवर नोंदविण्‍यात आला आहे. डिसेंबरमध्‍ये हाच दर 10.56 टक्‍क्‍यांवर होता. याशिवाय औद्योगिक उत्‍पादनाचा दरही घटला म्‍हणजेच, देशातील औद्योगिक उत्‍पादन घटत आहे. याचा परिणाम जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किंमतीवर पडणार आहे. परंतु, महागाई वाढविण्‍याचे संकेत देणा-या या बातम्‍यांमध्‍येही काही दिलासा देणा-या बातम्‍या आहेत.

महिन्‍याअखेरीस अर्थसंकल्‍प सादर होणार आहे. सध्‍याच्‍या युपीए सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्‍प आहे. त्‍यामुळे जनतेला काही दिलासादायक घोषणा अर्थसंकल्‍पात होण्‍याची शक्‍यता आहे. सर्वसामान्‍य जनतेचे घराचे स्‍वप्‍न साकारणे सोपे होऊ शकते. गृहकर्जाच्‍या व्‍याजावर जास्‍त कर सवलत, स्‍वस्‍त घरांवर जास्‍त कर्ज तसेच डीटीएच-फोन सेवांवर जास्‍त फायद्यांबाबत घोषणा होण्‍याची अपेक्षा आहे. तसेच सरकार आता प्रत्‍येकाला केवळ 1500 रुपयांमध्‍ये टॅबलेट देण्‍याचा विचार करीत आहे.