आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • People Search Variety Of Models Of Cars On Internet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार खरेदीचा मार्ग जातो इंटरनेटच्या खिडकीतून..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सध्याच्या तांत्रिक युगात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोक आता इंटरनेटची मोठी मदत घेताहेत. देशात सध्या 12 कोटींहून अधिक इंटरनेट ग्राहक आहेत. ताज्या अहवालानुसार कार खरेदीपूर्वी 50 टक्के ग्राहक आपल्या पसंतीसाठी इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत आहेत. एवढेच नव्हे तर यातील निम्म्याहून अधिक ग्राहक इंटरनेटवरील माहितीवरून आपली पसंत पक्की करतात. गुगल इंडियाच्या वतीने नीलसनने देशातील प्रमुख कार कंपन्यांच्या शोरूममध्ये केलेल्या ऑफलाइन संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या डीलरकडे येणार्‍या प्रत्येक दोन ग्राहकांपैकी एकाने ऑनलाइन रिसर्चची मदत घेतली आहे.

देशातील प्रमुख 8 महानगरांत हा सर्व्‍हे घेण्यात आला. त्यात आपल्या आवडत्या कारसाठी ऑनलाइन रिसर्चची मदत घेणार्‍या ग्राहकांची संख्या 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले. तसेच विविध कारबाबत नवी माहिती मिळताच या ग्राहकांनी आपला निर्णय बदलल्याचे निरीक्षण आहे. कार खरेदीदारांवर असणारा इंटरनेटचा प्रभाव या अहवालामुळे स्पष्ट झाला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ग्राहकांनी सांगितले की, कार खरेदीपूर्वी आम्ही इंटरनेटवर कारच्या किमती, व्हिडिओ तसेच छायाचित्रे पाहिली. त्यानंतर वितरकांशी संपर्क साधून कारबाबत अधिक माहिती आणि वापरासंबंधी सल्ला लक्षात घेतला. कार खरेदीसाठी इंटरनेटचा वापर करणार्‍या 50 टक्के ग्राहकांपैकी 42 टक्के ग्राहकांनी माहितीचा प्रथम स्रोत म्हणून इंटरनेटला प्राधान्य दिले, तर 47 टक्के ग्राहकांनी आपले मित्र आणि नातेवाइकांचा सल्ला घेतला.

कार खरेदीपूर्वी ती व्यक्ती कार संदर्भात सरासरी 9 ते 12 वेळा इंटरनेटवर रिसर्च करते. ज्या ग्राहकांनी इंटरनेटची मदत घेतली त्यातील 90 टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी आपल्या पसंतीच्या कारसाठी इंटरनेट सर्च इंजिनचा वापर केला. सुमारे 56 टक्के ग्राहकांनी आपल्या रिसर्चदरम्यान ऑनलाइन व्हिडिओ पाहिले. या सव्र्हेबाबत गुगल इंडियाचे उपाध्यक्ष आणि एमडी राजन आनंदन यांनी सांगितले की, वाहनांच्या खरेदीसाठी इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो यावर या ऑफलाइन सर्वेक्षणामुळे शिक्कामोर्तब झाले. गुगलवर विचारण्यात येणार्‍या प्रश्नांतही वाहनासंबंधीचे प्रश्न अधिक असतात. सर्वेक्षणातील निरीक्षणे या प्रश्नांची उकल करणारेच आहेत. या प्रश्नांच्या संख्येत वर्षाला 70 टक्के वाढ होत आहे. तसेच मोबाइल वाहन खरेदीसंबंधी विचारण्यात येणार्‍या प्रश्नांत 2011 मध्ये 125 टक्क्यांनी वाढ झाली आहे.इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या कार

ह्युंदाई इ-ऑन
महिंद्रा एक्सयूव्ही-500
होंडा ब्रियो
टाटा मांझा
मारुती किजाशी
टोयोटा लिव्हा
ह्युंदाई वेर्ना
निस्सान सनी
स्कोडा रॅपिड
फोर्ड फिएस्टा