आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनमध्येच तुमचा फोटो अभिनेत्रींसारखा बनवणारे खास अ‍ॅप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅग्झीनवरील फोटोंमध्ये सेलिब्रिटींचे दात चमकदार दिसतात मग सोशल साइटवर आपले का नको. आता तुमचा फोटोही तुम्ही सेलिब्रिटींप्रमाणे बनवू शकता. यासाठी अनेक मोफत अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.'परफेक्ट 365' नावाचे हे अ‍ॅप सेल्फीसाठी खूप फायदेशीर आहे. फोटो क्लिक करताच हे अ‍ॅप चेह-यावरील डाग काढून टाकते. म्हणजेच वन स्टेप मेकव्होअरसोबत नॅचरल लूक मिळतो.
कॅम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये फोटोला इफेक्ट देण्यापेक्षा मोबाइलमध्येच ब्युटी लूक मिळवण्यासाठी हे एक चांगले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. हे अ‍ॅप GOOGLE PLAYवर मोफत उपलब्ध आहे.
GOOGLE PLAYवर या अ‍ॅपला 5 पैकी 4.3 गुण मिळाले आहेत. GOOGLE PLAYनूसार हे अ‍ॅप आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुमच्या कडे अ‍ॅन्ड्राइड 2.3.3 च्या पुढचे व्हर्जन असणे गरजेचे आहे.