आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर: Petrol 2.42 तर Diesel 2.25 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच देशातील जनतेला पुन्हा एकदा खुशखबर मिळाली आहे. ती म्हणजे, पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्याची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 2 रुपये 42 पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 2 रुपये 25 पैशांनी रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. नव्या दरांनुुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर 56 रुपये प्रतिलिटर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा (क्रुड ऑईल) दर प्रति बॅरल 45 डॉलर्सवर आला आहे. क्रुड ऑईलच्या दरात पुन्हा झालेली घसरण देशातील जनतेच्या पथ्यावर पडली आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात केल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

दरम्यान, क्रुड ऑईलची मागणी घटल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने कमी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 26 मे 2014 पासून आजपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा कपात करण्यात आली आहे.
शहराचे नावपेट्रोलचे नवीन दरडिझेलचे नवीन दर
मुंबई63.9553.19
पुणे64.1653.19
नाशिक65.4754.65
औरंगाबाद64.0354.53
कोल्हापूर66.1355.27
नागपूर62.4752.34
टीप- हे हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपांवरील दर आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर ‍क्लिक करून वाचा, मोदी सरकारच्या कार्यकाळात कधी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर...