आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Diesel May Witness Another Price Cut In India

अच्छे दिन: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी घट देशाला दिलासा देणारी ठरली आहे. देशातील जनतेला लवकरच आणखी एक खुशखबर मिळणार आहे. ती म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत आहे. तसेच यूरोप व जपानची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. दुसरीकडे, चीनमधील विकासदर खाली झुकल्याचे दिसत आहे. त्यात ग्लोबल डिमांडमध्येही घट आली आहे. कच्च्या तेलाचे दर 60 डॉलर्स प्रति बॅरल पेक्षाखाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परिणामी अमेरिकेतील शैल ऑईलचे उत्पादन बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शैलमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्या देखील दिवाळखोरीत निघण्याची भीती निर्माण झाली आहे. यासोबत जगभरात एनर्जी इंफ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्येही गुंतवणूक करण्यात कोणी पुढे येणार नाही.
दुसरीकडे भारताचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक मंदी निर्माण झाल्याने भारताच्या निर्यातीला फटका बसेल. भारताचे मोठे नुकसात होईल आणि हे नुकसान कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने मिळणार्‍या फायद्यापेक्षा निश्चितच जास्त असेल, असेही तज्ज्ञांनी मत मांडले आहे.